Home चंद्रपूर दत्तात्रेय यांनीच पत्र चोरून सार्वत्रिक केले : देवतळे

दत्तात्रेय यांनीच पत्र चोरून सार्वत्रिक केले : देवतळे

373

चंद्रपूर: काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रेय व त्यांच्या सहकाऱ्यांनीच माझे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविलेले पत्र माध्यमात सार्वत्रिक केले असल्याचा आरोप काँग्रेसचे पदमुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
दत्तात्रय यांच्यासह त्यांच्या पत्रपरिषदेला उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिस्तभंगाची नोटीस पाठविणार आहे. तसेच पत्र चोरीचा आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दत्तात्रय व सहकाऱ्यांवर करणार आहे. अखिल भारतीय कॉग्रेस समितीद्वारे नियुक्त अध्यक्ष मीच आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीदेखील आपल्याशी जिल्हाध्यक्ष म्हणूनच पत्रव्यवहार करीत आहे. व्हीडीओ कॉन्फ्रन्सच्या बैठकीलादेखील मी उपस्थित होतो. महासचिव के.सी.वेणुगोपाल यांच्या पत्रातदेखील अध्यक्षपदाबाबतच्या स्पष्ट सूचना आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला अजुनही कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा पत्र पाठविले नसल्याचेही देवतळे म्हणाले.

Don`t copy text!