Homeचंद्रपूरपाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या घशात घालून चंद्रपूरकरांचा घसा कोरडा करू नका माजी...

पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या घशात घालून चंद्रपूरकरांचा घसा कोरडा करू नका माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांच्या उपोषणाला चंद्रपूरकरांच्या पाठिंबा

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात सध्या अमृत योजनेअंतर्गत नवीन नळ जोडणी चे काम सुरु आहे. हे काम अद्याप पूर्णत्वास होण्याच्या अगोदरच कंत्राटी पद्धतीने पाणीपुरवठा योजना चालविण्याबाबत पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या घशात घालून चंद्रपूरकरांचा घसा कोरडा करण्याचे पाप मनपा प्रशासन करीत आहे. असा आरोप करीत माजी नगरसेवक गोपाल अमृतकर या निर्णयाविरोधात आज दिनांक २२-६-२०२३ रोजी महानगर पालिका कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला चंद्रपूरकरांनी पाठिंबा दर्शविला आहे.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस सेवा दलचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सूर्यकांत खणके, काँग्रेस ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, बहुजन नेते बळीराजा धोटे, के के सिंह जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पप्पू देशमुख, माजी महापौर संगीता अमृतकर, महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, शहर जिला अध्यक्ष युवक कांग्रेस चंद्रपुर राजेश अडूर ,माजी,नगरसेविका वीना खनके, सकीना अंसारी, राजेश रिवेलीवार, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे जी निशा ढोंगडे, वंदना भागवत माजी नगरसेवक आकाश साखरकर, माजी नगरसेवक पिंटू शिरवार, युवक कांग्रेस कुणाल चहारे, रमीज शेख सामाजिक कार्यकर्ते नितीन बनसोड, माजी नगरसेवक संतोष लहामागे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक राजू आखरे, मनीष तिवारी जी माजी नगरसेविका मंगला आखरेपापू सिद्धिकी, नौशाद शेख,युवक काँग्रेस कार्यकर्ता राहुल विनोद वाघमारे चौधरी, प्रवीण कुमार वडलुरी, प्रकाश देशब्रतार, स्वप्निल चिवंडे,राजकुमार एडुला, राजकुमार स्वानपेल्ली, निकिल अडूर,यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा योजना कंत्राटदारामार्फत चालविण्यात आलेली होती. याचे अनुभव चंद्रपूरकरांना फार वाईट आलेले असून कित्येकदा पाण्याबाबत पालिकेवर मोर्चे आंदोलने काढल्या गेले. पालिकेने सुद्धा कित्येकदा कंत्राटदाराला समज देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत व शहरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत वरंवार ताकीद दिल्या या उपरातसुद्धा चार – चार दिवस नागरिकांना पाणी मिळत नव्हते. अखेरीस पालिकेतर्फे आमसभेत ठराव घेऊन कंत्राटदारांवर कारवाई करून कोर्टामध्ये खटला चालविण्यात आला होता. त्यानंतर पालिकेने पाणीपुरवठा चालविण्यासाठी स्वतःकडे घेतली होती.

हा जुना अनुभव लक्षात घेता पाण्यासारखी अत्यावश्यक सेवा हि कंत्राटदाराच्या घशात न घालता मनपाने स्वतःकडे ठेवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यात देखील तीव्र आंदोलन करण्यात असल्याचे माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांनी सांगितले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!