Home चंद्रपूर कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बल्लारपुरात पडसाद काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे धमकी प्रकरण...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बल्लारपुरात पडसाद काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे धमकी प्रकरण बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी

432

विसापूर : कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक १० मे रोजी होत आहे. निवडणूक प्रचारात आरोप -प्रत्यारोप होत आहे.दरम्यान कर्नाटक मधील चितपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा उमेदवार मनीकांत राठोड यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. भाजपाच्या उमेदवाराचे कृत्य लाजिरवाने असून लोकशाही मूल्य पायदळी घालविणारे आहे. याचे तीव्र पडसाद बल्लारपूर शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यात उमटले आहे.त्यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी एक निवेदन सहायक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांना सोमवारी देण्यात आले.

बल्लारपूर शहर काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांचे कुटुंब यांना जीवे मारण्याची धमकी राजकारणात शोभत नाही. मात्र यावर भाजपाचे नेतृत्व मुग गिळून आहे. भाजपाचे उमेदवार मनीकांत राठोड यांना पाठीशी घालत आहे. विधानसभा निवडणुकीतील राजकारण जनतेच्या मुद्यावर असायला पाहिजे. मात्र भाजपाचे उमेदवार गुद्यावरील भाषा बोलत आहे. आमच्या राष्ट्रीय नेत्यांना उघड धमकी दिली जात आहे. हा प्रकार काँग्रेसचे कार्यकर्ते खपवून घेणार नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या कुटूंबियांना धमकी देणारे भाजपाचे उमेदवार मनीकांत राठोड यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असी मागणी बल्लारपूर येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात बल्लारपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, इस्माईल ढाकवाला, नाना बुंदेल, अनिल खरतड,माजी न. प. गट नेते देवेंद्र आर्य, करमणकर आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Don`t copy text!