विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.मात्र आजही उपेक्षित समजल्या जाणाऱ्या आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या गुडशेला गावात भिमजयंती साजरी करून एकतेचे प्रतीक दर्शविण्यात आले.
दि.14 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्य जयंती निमित्त जिवती तालुक्यातील गुडशेला या गावी भीम जयंती जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली, दरवर्षी जयंती साजरी होत होती परंतु या वर्षी युवकांनी पुढाकार घेतला व सहकार्याची भावना दर्शवत गावातील युवक बांधवांनी भव्य मिरवणूक, तथागावातील युवक बांधवाना प्रमुख वक्ते यांचे मार्गदर्शन, व गावातील लहान मुलांचे भाषण, आणि संस्कृतीक कार्यक्रमाचे , आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथे समाजकार्याचे शिक्षण घेत असलेले श्रीकांत राजपंगे यांनी उपस्थितांना बाबासाहेबांचे विचार आजही आपल्याला किती मार्गदर्शक ठरतात या विषयी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ कुंटेवाड हे होते. प्रस्तावना बी. एस, मोरे यांनी केली. कार्यक्रमाचे संचालन गणेश कांबळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुडशेला येथील शाम नामपल्ले, माऊली पवार, मारोती कांबळे, गणेश गोविंद नामपल्ले व गावातील मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले.






