चंद्रपूर : सध्या देशात जातीयवादाचे राजकारण सुरु आहे. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीवादाला जोरदार टक्कर देऊन समतेचे राज्य प्रस्थापित केले होते. आज संविधान धोक्यात आले आहे. ते वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वज्रमूठ अधिक प्रभावी करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
आज खासदार बाळू धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालय व चंद्रपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. तसेच समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती चंद्रपूर द्वारा आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वा जयंती समारोह कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी काँग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, शहराध्यक्ष रामू तिवारी, शतकोत्तर जयंती महोत्सव समितीचे मुख्य संयोजक प्रवीण खोब्रागडे, अध्यक्षा गीता रामटेके, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा चंदाताई वैरागडे. महिला ग्रामीण काँग्रेस अध्यक्षा नम्रता ठेमस्कर, माजी महापौर संगीत अमृतकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, विनोद अहिरकर, शहर अध्यक्ष तजुद्दिन शेख ,ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत धांडे, अल्पसंख्याक नेते मतीन कुरेशी, तालुका काँग्रेस अध्यक्ष शामकांत थेरे, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, प्रकाश पाटील मारकवार,प्रशांत भरती, अनुताई दहेगावकर, कृणाल रामटेके, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, काँग्रेस सेवादल महिला जिल्हाध्यक्ष स्वाती त्रिवेदी, ज्योती शिवणकर, रवी मुन, प्रतीक डोर्लीकर, अजय बल्की, मीनाक्षी गुजरकर, संदीप सिडाम, यश दत्तात्रय, राज यादव, सौरभ ठोंबरे, राहुल चौधरी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, ज्या बाबासाहेबांना या देशात वाचण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते. त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले कि त्याच पुस्तकावर या भारत देशाचा पूर्ण राज्यकारभार चालतो. स्वतंत्र भारतात बाबासाहेबांकडे कायदेमंत्री, कामगार मंत्री आणि जलसंधारण मंत्री हे तीन खाते होते. तेव्हा कामगार नेते या नात्याने बाबासाहेबांनी सर्वच कामगारांवर फार मोठे उपकार केले आहेत. कारण पूर्वी अधिकारी असो किंवा कर्मचारी असो प्रत्येकाला तब्बल १४ – १४ तास काम करावे लागत होते. परंतु बाबासाहेबांनी त्या चौदा तासाचे फक्त आठ तास केले. इतकच नव्हे तर आठवड्यातून एक सुट्टी मिळावी यासाठी त्यांनी तरतूद करून मिळवून दिली. त्यासोबतच जलसंधारण मंत्री या नात्याने बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प हि संकल्पना ७० वर्षांपूर्वी मांडली होती. हि योजना प्रभावीपणे राबविली असती तर १२ हि महिने देशातील सर्वच ठिकाणी सिंचनासाठी पाणी उपलब्ध असते. त्यामुळे बाबासाहेबांच्या स्वप्नातील नदीजोड प्रकल्प राबविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.






