Homeचंद्रपूरशिल्पाताई प्रफुल्ल बनपुरकर यांना "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, "महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित..

शिल्पाताई प्रफुल्ल बनपुरकर यांना “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, “महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित..

चंद्रपूर – 05 मार्च 2023 विदर्भातील माता महाकाली चंद्रपूर नगरीमध्ये माहिती अधिकार , पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना आणि इंडिया 24 न्यूज चैनल च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर दादासाहेब मा.सा. कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे. कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रवींद्र श्रीनिवासराव शिंदे – विधानसभा प्रमुख वरोरा भद्रावती क्षेत्र , कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाश सकुंडे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष तसेच सदस्य – अल्पसंख्यांक आयोग ( भारत सरकार दिल्ली ) , राष्ट्रीय महिला अध्यक्षा – जयश्रीमाई सावर्डेकर , राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कैलास दादा पठारे , कार्यक्रमाचे मुख्य आयोजक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – तुळशीराम हनुमानजी जांभुळकर ( माहिती अधिकार, मुख्य संपादक) , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – रशीद पठाण ( आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ) , प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार , मराठी फिल्म अभिनेता विजयकुमार श्रीराम खंडारे मुंबई , राष्ट्रीय अध्यक्ष – संजय देशमुख ( लिंबेकर ) लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – संजयकुमार कोठेचा इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्ली , अध्यक्ष जितेंद्र चोरडिया डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर, केंद्रीय सचिव राजेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले.

संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र रत्न गौरव सोहळ्याला चंद्रपूर , गोंदिया , भंडारा , नागपूर , वर्धा , लातूर , बारामती पुणे , अमरावती , हिंगोली , सांगली , परभणी , या कार्यक्रमांमध्ये नारीशक्तीचा सिंहाचा मोठा वाटा दिसून आले आहे. त्यामध्ये चंद्रपुरातील एक गरीब कुटुंबात जन्मलेली गृहिणी समाजसेविका शिल्पाताई प्रफुल बनपुरकर यांना “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले “महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संघटनेने जास्तीत जास्त स्त्रीसक्तीचा सिंहाचा वाटा असल्याचे दिसून आले.

शिल्पाताई बनपूरकर संघटनेचे चार वर्ष काम करीत आहेत. शिल्पाताई जिल्हा पासून तर महाराष्ट्र पर्यंत संपूर्ण पदे भुसावलेली आहेत. त्यांनी उत्कृष्टपणे संघटनेचे कामे पारपाडलेली आहेत. तसेच इंडिया 24 न्यूज चैनल च्या संपादिका पदी त्या आज रोजी विराजमान आहेत. त्यांना अनेक क्षेत्रात कामे करण्याची इच्छा दर्शविलेली आहे. माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना. या सामाजिक संघटनेमध्ये त्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा पदी काम करीत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना ( भारत ) महाराष्ट्र प्रदेश महिला समन्वयक पदी सुद्धा त्या कार्यरत आहेत. गोरगरिबांना सतत मदत करीत असतात. संघटनेचे कार्य वाढविण्यासाठी सतत तत्परतेने तेजस्वीतेने व निस्वार्थ पणाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा वाटचाल सुरू आहे. त्यांचे सहकार्य संघटनेला लाभलेला आहे. अनेक कुटुंबांना आज रोजी त्यांची मदत मिळाली आहे. त्यांचे कुटुंब व त्यांचा परिवार त्यांना अनेक संघर्षांना साथ देण्यासाठी तयार आहे. अन्याय अत्याचार रोखण्यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये नावलौकिक केलेला आहे. भ्रष्टाचारावर आला घालण्याची त्यांचे प्रयत्न आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा असे ताईचे स्वप्न आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अन्याय अत्याचार रोखण्यासाठी त्यांचे कार्य चालू आहे.

शिल्पाताई बनपूरकर ला “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरावरून व मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आभार प्रदर्शन किशोर मुटे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष , सूत्रसंचालन श्रुती सरकार , प्रलय मशाखेत्री यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आयोजक :- राज जांभुळकर मुख्य कार्यकारी संपादक , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अरुण माधेशवार , नागेंद्रजी चटपल्लीवार महाराष्ट्र प्रदेश सल्लागार , कारण कोलगुरी महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुख , कीर्ती पांडे महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष , किरणताई साळवी महाराष्ट्र प्रदेश महिला संघटिका , हर्षलता बेलखडे महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष , चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुनील रामटेके या सर्व आयोजकांचे कार्यक्रमाला मोलाचे योगदान मिळाले. कार्यक्रम यशस्वी पार पडला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!