Home गडचिरोली अभ्यासाची सवय लावा त्यातून चांगले बदल घडते- उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण गिल्डा…पोतेपल्ली...

अभ्यासाची सवय लावा त्यातून चांगले बदल घडते- उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण गिल्डा…पोतेपल्ली येथे सर्वाच्या सहभागातून वाचनालयाचे उद्घाटन…

557

घोट : २३ डिसेंबर
अभ्यासाची सवय लावा त्यातून चांगले बदल घडते जेष्ठ नागरीकांनी आता पर्यंत जे काही केल असेल नसेल परंतू नव्या पीढीने आपली जी येणारी पीढी आहे त्यांना चांगल्या अभ्यासाची सवय लावा त्यातूनच कुठेतरी बदल घडेल व चांगल्या प्रकारे नौकरी करतील सेवा करतील,अधिकारी होतील व पोलीस भरतीचीच्या माध्यातून तयारी करूण आपल्या परिवारातून आमच्या पोलीस परिवारात सामील व्हावा तसेच मेळाव्याच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात त्याच्या नागरीकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन पोतेपल्ली भव्य जनजागरण मेळाव्यातुन प्रविण गिल्डा यांनी केले.येथे पोलीस भरतीची तयारी करणेसाठी ग्राउंड व ग्रामस्तरावरील वाचनालयाच्या उदघाटन, जनजागरण मेळाव्या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी प्राणिल गिल्डा यांनी व्यक्त केले.पोलीस दादारोला खिडकीच्या माध्यमातून पोलीस मदत केंद्र रेगडी च्या वतीने पोतेपल्ली येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे तसेच विरबाबुराव शेडमाके वाचनालय व पोलीस भरतीचे ग्राउंडचे उद्घाटन करण्यात आले.

या वाचनालयाचे तथा जनजागरण मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी नंदकुमार शिंब्रे,रेगडी प्राथमीक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . उमाकांत मेश्राम,डॉ प्रीती पवार,प्रशांत शाहा,पोलीस उपनिरीक्षक राहुल बिगोत,जिल्हा प्रवेक्षक मनोज उराडे,पोलीस उपनिरक्षक अरुण वाघ , पो.उपनिरीक्षक जनार्धन काळे,पो.उपनिरीक्षक मल्हारी वनवे,जगदीश गिल्डा,पोलीस पाटील ज्योतीका बेपारी , सरपंच संगीता वैरागडे , गाव मुखिया पांडुरंग तिम्मा , उपसरपंच प्रविण मोहुर्ले , मैनाबाई हिचामी,पी. के. कांबळे,पत्रकार हेमंत उपाध्ये,मच्छिंद्रनाथ हिचामी सावंत वाकोडे , हस्ते भगत आदी उपस्थित होते या वेळी विविध योजनांच्या माहीती सोबत नागरीकांना ५० कंबल , महिलांना ५० साड्या , शिसु विकास योजनेचे ८ कार्ड,किसान धन आरोग्य योजनेचे १ कार्ड वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोतेपल्ली येथील सोमजी तीम्मा,मनोहर हिचामी, उपसरपंच गिरमा हिचामी,ग्रामपंचायत सदस्य उमेश कुलयेटी , रंजीत तिम्मा तसेच पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर मडावी संचालन मनोज झाडे तर आभार नंदकुमार शिंब्रे यांनी मानले

Don`t copy text!