प्रितम गग्गुरी(जिल्हा प्रतिनिधी)
अहेरी:- तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गरीब शालेय विद्यार्थी सायकल नसल्याने अनेक किमीची पायपीट करीत शाळेत ये-जा करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेत टायगर ग्रुप आलापल्लीच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकल तसेच शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
दुर्गम भागातील गरजू, गरीब विद्यार्थ्यांची शाळेत पोहचण्यासाठी होणारी धडपड लक्षात घेता १५ ऑक्टोबर माजी राज्यमंत्री आम्ब्रीशराव महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टायगर ग्रुप आलापल्लीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना 10 सायकलीचे वितरण करण्यात आले. यासोबतच बुक, स्कूल बॅग, पेन, पेन्सील आदी शैक्षणिक साहित्यासह खाऊ विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला.






