चंद्रपुर: सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर च्या वतीने दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह आयोजित केला जातो .या अंतर्गत शहरा मध्ये रॅलीचे आयोजन, आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान ,व्यसनमुक्ती जनजागृती ,अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, शासकीय विविध योजना ची माहिती इत्यादी कार्यक्रमाचे विविध ग्रामीण ,शहरी भागात शाळा, महाविद्यालय ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते .राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती अवचिता ने दि.08 ऑक्टोबर 2022 ला सप्ताहा चे समारोप प्रसंगी महात्मा गांधींचे विचार व आजचे शासकीय धोरण या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र महाविद्यालयाने ऑनलाईन आयोजित केले होते. या चर्चासत्राच्या मार्गदर्शनासाठी डॉ. हरसिंग गौर विश्वविद्यालय, सागर( मध्यप्रदेश) मधून डॉ. पंकजसिंग हे प्रमुख वक्ते ऑनलाईन मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शक व नियंत्रण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकूरे तर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सुभाष गिरडे, डॉ. किरणकुमार मनुरे , डॉ.निलेश ढेकरे, प्रा. सिद्धार्थ वाकूडे राष्ट्रीय चर्चासत्राचे सह -समन्वयक होते.
डॉ. पंकजसिंग यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ग्रामीण स्वराज्य, सर्वोदय व गांधीजींचे विचार ,मूल्य आजच्या राजकीय नेत्यांना यांचा विसर पडलाआहे. त्यामुळे ग्रामीण क्षेत्राकडे किंवा ग्रामीण सक्षमीकरणाकडे राजकीय नेतृत्वाला दिशा मिळाली नाही. शहरात येणारा नवयुवकाचा लोंढा थांबवण्याकरिता ग्रामीण सक्षमीकरण करून शेती व्यवसायाची पूरक उद्योग धंदे, शिक्षण, आरोग्य व कल्याणकारी योजना राबविने महत्त्वाची आहे.
ग्राम ते संसद हा सत्तेच्या विकेंद्रीकरण्याचा मार्ग आज पर्यंत शासकांनी न करता त्याचे विपरीत संसद ते ग्राम असे व्यवस्था उभारल्यामुळे महात्मा गांधीं विचारतील उदेमशिल भारत घडू शकला नाही. आज जगापुढे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांना एक मानवतावादी पर्याय गांधी विचारातून प्राप्त होऊ शकतो याची जाणीव आज लोकांना होत आहे.
आजच्या युवकांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वालंबन , साधी जीवनशैली ,इत्यादीचा गांधी विचारांचा आपल्या जीवनात विचार अंगीकारणे अतिशय महत्त्वाचे आहे. असे विचार जागतिक करण्याच्या काळात असे विचार डॉ.पंकजसिंग यांनी राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये मत प्रकट केले. या राष्ट्रीय चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ.किरणकुमार मनुरे , प्रास्ताविक व परिचय डॉ. निलेश ढेकरे व आभार प्रा. डॉ. सुभाष गिरडे
या चर्चासत्रामध्ये राज्यातील प्राध्यापक संस्थेची प्रतिनिधी व विद्यार्थी वर्ग ऑनलाईन मध्ये उपस्थित होते.






