Home चंद्रपूर रिद्धीने वाढदिवसाच्या निमित्ताने डेबू सावली वृद्धाश्रमात केले फळ वाटप…

रिद्धीने वाढदिवसाच्या निमित्ताने डेबू सावली वृद्धाश्रमात केले फळ वाटप…

432

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)

चंद्रपुर: शहरातील कु. रिद्धी राजकुमार केसकर हिच्या १८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने डेबू सावली वृद्धाश्रम, देवाळा येथे दि. १४ ऑक्टोबर २०२२ ला वृद्धांना फळ वाटप करून वाढदिवस वृद्ध आजी-आजोबांच्या सानिध्यात साजरा करण्यात आला.

खरंतर आजच्या पिढीतील मुलांचा वाढदिवस असला तर मोठया मोठ्या पार्ट्या डोळ्यासमोर दिसतात. मित्रांच्या आनंदासाठी आजकालची पोरं हजारो रुपये खर्च करतात. पालकही आवर्जून पैसे देतात. असेच चित्र एकीकडे असतांना आपला वाढदिवस समोर येत आहे, काही तरी चांगल्या ठिकाणी आपला वाढदिवस व्हावा हा विचार रिद्धीच्या मनामध्ये होता. तो विचार तिने आपल्या आई-बाबांसमोर बोलू दाखविला.

आपल्या मुलीच्या मनातील इच्छा ऐकून पालकांना सुद्धा आनंद झाला आणि वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे दि. १४ ऑक्टोबर २०२२ ला डेबू सावली वृद्धाश्रम, देवाळा येथील वृद्धांना फळ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी रिद्धीच्या आई वडिलांनी मनोगत व्यक्त करीत वृध्द लोकांच्या आयुष्यामध्ये एक नवी पहाट व नवी आशा पल्लवित व्हावी याकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या. पुढे रिद्धीने आपले मनोगत व्यक्त करीत स्वतःच्या आजीची उपमा देत काही वेळ तिथले वातावरण भावूक केले. तसेच वृध्द आजी-आजोबांनी रिद्धी चे तोंड भरून कौतुक करीत तिच्या आई वडिलांनी तिला या वयात सुंदर संस्कार देत घडविले हेच खूप मोलाचे कार्य केले असे मत व्यक्त केले. तिथल्या ज्येष्ठ नागरिकांनी रिद्दीला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी युवा कवी सूरज दहागावकर यांनी आपल्या कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. तसेच युवा व्याख्याते प्रलय म्हशाखेत्री यांनी सुद्धा आपल्या सुमधुर वाणीतून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी रिद्धीचे आईवडील, आजी, म्हशाखेत्री दांपत्य आणि मित्र परिवार उपस्थित होते.

Don`t copy text!