Homeचंद्रपूरजिवतीनिवडनुकीच्या मैंदानात ५२२ उमेदवार गावा गावात राजकीय वातावरण दणाणले

निवडनुकीच्या मैंदानात ५२२ उमेदवार गावा गावात राजकीय वातावरण दणाणले

 

जिवती(ता.प्र.) तालुक्यातील २९ ग्राम पंचायतिच्या थेट सरपंच पदासह २६ तारखेला १७४ उमेदवारांनी सदस्य पदाकरीता व ३७ उमेदवारांनी थेट सरपंच पदाकरीता आणि शेवटच्या दिवशी ३०६ उमेदवारांनी सदस्याकरिता व ७३ उमेदवारांनी थेट सरपंच पदाकरीता अशी
एकूण सदस्य पदाकरीता ४७९ व सरपंच पदाकरीता १११ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.
त्यापैकी छाननीअंती साह उमेदवार सदस्य पदाकरीता
व चार थेट सरपंच पदाकरीता १० नमंकने रद्द करण्यात आली.३० सप्टेंबर २०२२ ला ४२ सदस्य व १६ सरपंच पदाच्या उमेदवारांनी माघार घेतली.
२९ ग्राम पंचायत पैकी फक्त एक पिट्टीगुडा नंबर – २
ग्राम पंचायत बिनविरोध निवड झाली.बाकी २८ ग्राम पंचायतीत ४३१ सदस्य पदाकरीता तर ९१ सरपंच पदाकरीता असे एकूण ५२२ उमेदवार निवणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ ॲक्टुंबरला निवडणूक होऊ घातली आहे.निवडणूक मैंदाणात ४३१ सदस्य पदाकरीता आणि ९१ सरपंच पदाकरीता असे एकूण ५२२ उमेदवारांनी निवडणुक प्रचाराला सुरुवात केली आहे.
आपल्या पॅनलची सता आली पाहिजे,या हेतूने प्रत्येक ग्राम पंचायतीत प्रत्येक पॅनलने चांगलीच कंबर कसली आहे.गावांगावात बॅनर, आडीओ क्लिपद्वारे,तसेच समाज माध्यमातून निवडणुकीच्या आखाड्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.
राजकीय वातावरण तापले आसून कुणाची हाती सता येणार याकडे लक्ष लागले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!