अखेर ‘त्या’ वादग्रस्त गावातील नागरिकांना मिळाला दीलासा

1076

जिवती(ता.प्र.) तालुक्यातील महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमा वादात अडककेली वादग्रस्त १४ गावांचा सिमांकनाबाबतच्या २५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या समसेचा निपटारा होत आहे.अखेर गुरुवारी सकाळी वादग्रस्त १४ गांवापैकी मुकदमगुडा या गावातून महसुली मोजनीला सुर्वात झाली आहे.

तालुक्यातील एकूण ८३ महसुली गांवापैकी फक्त ७५ गांवचा रेकॉर्ड महसुली विभाग तसेच भुमी अभिलेख विभाग कार्यालयाकडे उपलब्ध आहे;परंतु आठ महसुली गावे व सहा गुडे, पाडे असा एकूण १४ गांवचा रेकॉर्ड मागील ४० वर्षापासून उपलब्ध नाही.पिढ्यान् – पिढ्या कसत असलेल्या १४ गांवातील २३८७ हेक्टर जमिनीची आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मुकदमगुडा येथे महसुल मोजनिला सुर्वात झाली.