स्वराज्य फाउंडेशन तर्फे रुग्णाला मिळाली तात्काळ मदत

482

अहेरी :- नितीन तलांडे नामक व्यक्ती हा आल्लापल्ली चा  रहिवासी असून या व्यक्तीची प्रकृती ठीक नसल्यामुळे काल दिनांक ७ जुलै २०२२ ला नागेपल्ली येथील सेवा सदन रुग्णालयात भर्ती करण्यात आले आणि त्याचा उपचार त्या ठिकाणी केल्या जात होता पण उपचार करीत असताना आज ठीक सकाळी ११:०० वाजता त्या व्यक्तीची प्रकृती अधिक खालावली आणि त्यामुळे त्या रुग्णाला स्वास घ्यायला त्रास होत होता.

त्यामुळे त्या रुग्णाला लवकरात-लवकर पुढे उपचाराकरिता अहेरी येथील रुग्णालयात दाखल करावयाचे होते आणि ही बाब स्वराज्य फाउंडेशनला त्यांचा परिवारातील सदस्यांनी सांगितले असतास त्वरित त्या रुग्णाला स्वराज्य फाउंडेशनचा रुग्णवाहिकेने अहेरी येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे त्या व्यक्तीला उपचार मिळण्यास मदत झाली.