Home गडचिरोली गडचिरोली पोलीस विभागाकडून परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना जाहीर

गडचिरोली पोलीस विभागाकडून परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना जाहीर

4581

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार १९ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्याकरिता गडचिरोली पोलीस विभागाकडून परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

– सर्वसाधारण सूचना 
– उमेदवारांना प्रवेशपत्राशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
– उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर रहावे.
– उमेदवारांनी मोबाईल फोन गणकयंत्र, पेजर, अथवा अन्य साहित्य किंवा इतर कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्वतःजवळ ठेवू नये.  .
– परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षा संपेपर्यंत कोणालाही परीक्षा हॉल मधुन बाहेर जाता येणार नाही.
– OMR शौटमध्ये उत्तर लिहीतांना काळ्या बॉलपेनचा वापर करावा.
– उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीच्या अधीन राहुन लेखी परीक्षासाठी प्रवेश देण्यात येत आहे.
– उमेदवारास प्रवेश दिला याचा अर्थ त्यांची उमेदवारी स्विकारली असा होत नाही, कोणत्याही टप्यावर उमेदवार अपात्र असल्याचे आढळून आल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
– एकाच नावावर दुसरा उमेदवार बसल्यास त्याला अपात्र ठरविण्यात येईल, व संबंधीत प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– उमेदवारांनी OMR शीटवर त्यांचा बैठक क्रमांक लिहावा आणि व्यवस्थितरित्या गोल करावा. “अन्यथा आपली OMR शीट रद्द समजण्यात येईल.
– उमेदवारांनी चाचणीसाठी येतांना आपल्या सोबत कुठलेही एक ओळखपत्र जसे की, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट, मतदान कार्ड, पॅन कार्ड सोबत आणावे.
– परीक्षा झाल्यावर उमेदवाराने OMR शीट पर्यवेक्षकास परत करणे अनिवार्य राहील.
– लांब पल्ल्यावरुन प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे. जेणेकरुन निर्धारीत वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य होईल

Don`t copy text!