Home गडचिरोली गडचिरोली: पोलीस नक्षल चकमकीत एक जवान जखमी

गडचिरोली: पोलीस नक्षल चकमकीत एक जवान जखमी

2500

गडचिरोली – भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात आज (ता. ३) सकाळच्या सुमारास पोलिस आणि नक्षल्यात उडालेल्या चकमकीत एक पोलिस जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार पोलिस दलाच्या सी-६० पथकाचे पोलिस जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस जवानांवर अचानक अंधाधुंद गोळीबार केला पोलिसांनीही नक्षल्याना चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यात एक पोलिस जवान जखमी झाला असून जवानाला हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.

घटनास्थळी काही नक्षल्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी नक्षल्यांचे मोठ्या प्रमाणात साहित्य हस्तगत करण्यात पोलिस जवानाना यश आले आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस कुमक वाढविण्यात आले असून सर्चींग ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले. यासंदर्भात अतिरिक्त पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख यांना विचारले असता अभियान अद्याप सुरूच असून संपूर्ण माहिती मिळताच कळविण्यात येईल, असे सांगितले.

Don`t copy text!