गडचिरोलीतील जलतरण तलाव सुसज्ज व्यवस्थेसह सुरु . जलतरणपटू आणि शिकाऊ उमेदवारांना प्रवेश .

822

चक्रधर मेश्राम सहसंपादक

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा क्रिडा संकुल समितीचे जलतरण तलाव लाॅकडाऊन मुळे १- २ वर्ष बंद होते. मात्र आता संपूर्ण दुरुस्ती करून, उत्तम सुविधांसह सुरू झाले असून पोहता येणारे विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, महिला, पुरुषांना प्रवेश देणे सुरू करण्यात आले असून इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि निर्धारित शुल्क भरुन प्रवेश घ्यावा असे आवाहन जलतरण तलाव व्यवस्थापनाने केलेले आहे.

नियमित सुरू असलेल्या राज्यातील काही मोजक्या जलतरण तलावापैकी एक असलेल्या गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुल समितीचा एकमेव जलतरण तलाव लाॅकडावून आणि दुरुस्ती करीता बंद होते. आता जिल्हा क्रीडा संकुल समितीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुसज्ज फील्टर प्लाॅन्ट, निर्जंतुकीकरण यंत्रणा आणि बांधकाम विभागामार्फत नवीन टाईल्स आणि इतर उर्वरित असलेली कामे करण्यात आली आहेत. अनुभवी कंत्राटदार नेमून शहरातील नागरिकांना पोहण्याकरीता जलतरण तलाव उपलब्ध करून दिले आहे.
पोहता येणाऱ्यांकरीता सकाळी आणि सायंकाळी ६ ते ८ वाजता कोणत्याही एका तासाकरीता प्रवेश देणे सुरू आहे. तसेच पोहता न येणारे विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, महिला व पुरुषांना प्रशिक्षण शुल्क घेऊन सकाळी ८ ते ९ आणि सायंकाळी ४ ते ६ एका तासाकरीता पोहण्याचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.