बोलेपल्ली येथील युवा शेतकरी संदीप मट्टामी यांची भरारी…

139

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट

मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथील रहिवासी संदीप  मट्टामी यांनी दिल्ली येथील संपन्न झालेल्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आणि कडधान्य आत्मनिर्भर योजनांच्या शुभारंभ राष्ट्रीय कृषी विज्ञान परिसर, पुसा नवी दिल्ली येथे झाला. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी बोलेपल्ली (मुलचेरा) येथील युवा शेतकरी श्री. संदीप मट्टामी यांची सुभगाॅन शेतकरी उत्पादक कंपनी, मुलचेरा कडून निवड झाली. त्यांना पीएमओ कार्यालयतर्फे निमंत्रण आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पाडला. श्री. संदीप मट्टामी यांनी संम्पुर्ण जिल्हयाचे प्रतिनिधीत्व केले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मा. बोथिकर सर कृषी अधिकारी मा. पवार सर नैसर्गिक शेतकरी बारसाय मडावी यांची उपस्थित होते.