Home नागपूर जीडीसी परीक्षेसाठी 31 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

जीडीसी परीक्षेसाठी 31 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

323

दिनेश मंडपे 
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

दि. 4 : सहकार विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी अँड सी.एच.एम परीक्षा 27 ते 29 मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. चालू वर्षात परिक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीने 31 मार्च अर्ज स्विकारण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परीक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाही, असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी कळविले आहे.
उमेदवारांनी httpd://maharashtra.gdca.gov.in या संकेतस्थळावर 31 मार्च 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, तसेच 4 एप्रिलपर्यंत बँकेमध्ये चलनाने शुल्क जमा करावे.
परीक्षार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत अधिसूचना या विभागाच्या https:sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरतांना तयार केलेला स्वत:चा युजर आयडी व पासवर्ड परिक्षार्थींनी परिक्षेचा निकाल प्रसिध्द होईपर्यंत योग्य प्रकारे जतन करुन ठेवणे आवश्यक आहे, असेही प्रसिध्दीपत्रकात नमूद आहे.
000000

Don`t copy text!