जि. प.सदस्य अतुल गण्यारपवावार यांच्या वाहनाचा अपघात, आनंद गण्यारपवार ठार तर अतुल गण्यारपवार गंभीर जखमी.

640

चक्रधर मेश्राम सहसंपादक गडचिरोली

ब्रम्हपुरी : गडचिरोली- चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व गडचिरोली जिल्हा परिषदेचे नामवंत कार्यकुशल सदस्य अतुल गण्यारपवार हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांचे सोबती आनंद गण्यारपवार हे अपघातात जागीच ठार झाले असल्याचे वृत्त हाती आले आहे.

आज सकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी मार्गे नागपूरला जात असताना ब्रम्हपुरी तालुक्यातील रुई गावाजवळील रनमोचन फाट्याजवळ कार क्रमांक MH 33 v 245 ने समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात कार मधील आनंद गण्यारपवार जागीच ठार झाले असल्याचे वृत्त आहे. तर अतुल गण्यारपवार हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. -सदर झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांची आपसात जोरदार धडक झाल्याने, ट्रॅक्टरचे इंजिन चे मधातून दोन तुकडे झाले होते.

या घटनेची सविस्तर माहिती ब्रम्हपुरी पोलिसांकडून जाणून घेतली असता, आनंद गण्यारपवार हे जागीच गतप्राण झाले असून अतुल गण्यारपवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे पोलिस निरीक्षक रोशन यादव यांनी सांगितले आहे.