पावसाने वाढवली शेतकऱ्याची डोकेदुखी..सोयाबिनला कोंब फुटण्याची शक्यता…

338

शरद कुकूडकार प्रतिनिधी भंगाराम तळोधी

गोंडपीपरी तालुक्यात मुसळधार पावसाची दमदार सुरवात झाली दर दोन दिवसाआड पाऊस सुरूच आहे. अश्यातच खरीप हंगामात लागवड केलेले सोयाबीन पीक कापण्याची वेळ आली मात्र दर-दोन दिवसाआड पाऊस येत असल्याने सोयाबीन पीक कापायचे कसे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. पावसाचा कहर सुरूच राहल्यास शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीक शेतातच उभे राहुन सोयाबीन ला कोंब फुटण्याची शक्यता आहे.