गोंडपिपरी तालुका महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न…महिला काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याचे आवाहन

409

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे)

गोंडपिपरी तालुका महिला काँग्रेसची आढावा बैठक नुकतीच येथे संपन्न झाली.सदर बैठकीत महिला काँग्रेस च्या कार्याचा आढावा घेण्यात येऊन महिला काँग्रेस चे संघटन अधिकाधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.

स्थानिक जिल्हा सहकारी बँकेच्या वरच्या माळ्यावर संपन्न झालेल्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा चित्राताई डांगे उपस्थित होत्या.
तालुका काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा रेखाताई रामटेके यांच्या पुढाकाराने महिला काँग्रेसची आढावा बैठक प्रथमच आयोजित करण्यात आली.

माजी नगराध्यक्षा सपनाताई साकलवार ,शारदाताई गरपल्लिवार यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्राताई डांगे यांनी ‘तालुका काँग्रेसचे संघटन अधिकाधिक मजबूत करण्याचे आवाहन आपल्या भाषणातून केले’.

प्रास्तवीकपर् भाषणातून रेखाताई रामटेके यांनी बैठकीमागची भूमिका,तालुक्यातील महिला काँग्रेस ची स्थिती यावर प्रकाश टाकला. सदर बैठकीला अनेक महिलांची
होती. देवेंद्र बट्टे, खेमदेव गरपल्लीवार यांनी बैठकीला सहकार्य केले.