इंदिरा विद्यालय, वरूर रोड येथे शांताराम पोटदुखे यांना वाहिली श्रद्धांजली

608

राकेश कडुकर (राजुरा तालुका प्रतिनिधी)

राजुरा: चंद्रपुर भुषण शांताराम पोठदुखे यांच्या तृतिय पुण्य स्मरणात त्यांच्या संपुर्ण संस्थेमध्ये स्मृतिदिन साजरा केला जातो.परंतु इंदिरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वरुर रोड या शाळेत खूप वेगळ्या प्रकारे स्मृतिदिन साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात दोन वर्षापूर्वी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. त्याच लावलेल्या पिंपळ या वृक्षाची पूजा करून शाळेत काही क्षण मौन धारण करण्यात आले. शांताराम पोटदुखे यांचे जिवन कार्य ,त्यांचे आचार-विचार ,त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती मोलाचा आहे याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रामदास गिरडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे विचार-आचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करुन भविष्यात त्या विचारांना नव-आकार कसा देता येईल याबद्दल माहिती सांगण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित शाळेतील मुख्याध्यापक रामदास गिरडकर, जेष्ठ शिक्षक प्रवीण धोटे, प्रशांत भगत, संदीप पिंपळकर, नारनवरे , मनीषा मुरकुटे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.