मुक्तिपथ अभियानातर्फे ३४ रुग्णांनी घेतला दारू मुक्त होण्याच्या निर्धार..

253

मुक्तिपथ अभियानातर्फे सिरोंचा, चामोर्शी, अहेरी व कोरची येथील मुक्तिपथ तालुका कार्यालयात शुक्रवारी तालुका क्लिनिकचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून ३४ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याचा संकल्प केला.

सिरोंचा तालुका क्लिकमध्ये ४, चामोर्शीत ९ अहेरीत १६, तर कोरची तालुका क्लिनिकमध्ये ५ रुग्णांनी उपचार घेतला, अशा एकूण ३४ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी रुग्णांना समुपदेशनसुद्धा करण्यात आले.

दारूचे व्यसन कसे लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे, आदींची माहिती रुग्णांना देण्यात आली. रुग्णांची माहिती घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले. तसेच रुग्णांवर औषधोपचारसुद्धा करण्यात आले. उपचार घेतल्यास व्यसनातून मुक्त होण्यास मदत मिळते. त्यामुळे रुग्णांनी क्लिनिकचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.