ब्रेकिंग न्यूज: चंद्रपुरात युवकाने युवतीला चाकूने भोसकले

0
933

चंद्रपूर: येथील महाकाली मंदिर परिसरात सायंकाळच्या सुमारास एका युवकाने प्रेयसीवर चाकु हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना येथे घडली.आरोपी प्रियकराला अटक केली आहे. दोघेही युवक-युवती बाबूपेठ परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

तरुणीवर उपचार सुरु

तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला लगोलग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथले डॉक्टर्स उपचारासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.

पोलिसांनी 3 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या

चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर मार्गावर गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या मार्गावरील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटनेनंतर पळताना आरोपी कैद झाला. हल्ल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 3 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

गजबजलेल्या भागात झालेल्या घटनेने खळबळ

या प्रकरणातील युवक-युवती एकमेकांना परिचित असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्वतः पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी शहर पोलिस ठाण्यात पोचून घटनेचा आढावा घेतला. ऐन सणांच्या काळात गजबजलेल्या भागात झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान हल्ल्याचा हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here