पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज- समतादूत बालाजी मोरे…

433

दिपक साबने,जिवती
सद्यस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजन वायूचा तुटवडा भासू लागला आहे. याच कारणाने ऑक्सिजन वायूचे जाणीव होऊ लागली आहे. म्हणूनच तर वृक्ष लागवड करणे काळाची गरज झाली आहे. याचाच औचित्य साधून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बार्टी कडून पोलीस स्टेशन,राजुरा च्या आवारात नुकतेच वृक्षारोपण पंधरवडा अंतर्गत आयोजन केले होते.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डाँ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्य पोलीस स्टेशन ,राजूरा च्या आवारात येथील API झुरमुरे यांच्या हस्ते समतादूत बालाजी मोरे यांनी वृक्षारोपण केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन समतादूत बालाजी मोरे यांनी जिल्ह्याचे प्र.अ. मनीष गणवीर यांच्या मार्गदर्शनात पार पडले. यावेळी वृक्षारोपण करिता पोलीस स्टेशन येथील कर्मचारी वर्ग पोलीस कॉन्स्टेबल श्रीमंत कदम, अरविंद डुकरे व निलेश मेकाले इत्यादींच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.