रेतीतस्करी: गोंडपिपरीतील कुलथा घाटावरून अवैध रेती उपसा करणारे चार ट्रॅक्टर महसूल विभागाच्या ताब्यात…

653

गोंडपिपरी. तालुका प्रतिनिधी
 नागेश इटेकर

गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा व अंधारी नदी
घाटावर रेती माफियांचा धुमाकूळ मागील महिनाभरापासून सुरू होता.ऐन लाकडाऊंच्या काळात सुरू असलेल्या या प्रकार चा प्रसिद्धी माध्यमाद्वारे वीस दिवसापासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र यादरम्यान तालुका प्रशासनाने कुठलीच कार्यवाही न करता माफियांना खुली सूट दिल्याचा प्रकार दिसून आला त्याचवेळी उशिरा का होईना येथील तहसीलदाराने कूलता घाटावर धाड टाकून चार आणि गोंडपिपरी शिवाजी चौकात एक अशा पाच ट्रॅक्टर जप्त करून गोंडपिपरी पोलीस ठाण्यात जमा केले.

लाकडाउनच्या काळात संचार बंदी व जमावबंदी लागू असतानाही गोंडपिपरी तालुक्यात रेती माफिया कडून कहर सुरू होता याबाबत प्रसिद्धी माध्यमाने वारंवार पाठपुरावा करून देखील कुठल्याच प्रकारे कार्यवाही होताना दिसली नाही दरम्यान रेती माफिया याकडे नदीकाठावर मालाच्या साठवणुकीसाठी स्थानिकांच्या ट्रॅक्टर लावल्या होत्या. या ट्रॅक्टर द्वारा रात्रभर नदीपात्रातून मालाची डम्पिंग सुरू होती.सदर प्रकार सुरू असताना याची गोपनीय माहिती गोंडपिपरी चे तहसीलदार के.डी. मेश्राम यांना मिळाली माहितीच्या आधारावर त्यांनी आपल्यासह पोलीस पथक घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी स्थानिक कुलथा गावातील पोलीस पाटील व सरपंच यांच्या मदतीने त्यांनी कुलथा गावाजवळ रेतीने भरलेल्या चार ट्रॅक्टर जप्त केल्या. त्याच वेळी गोंडपिपरी येथील शिवाजी चौकात रेती वाहतूक करणाऱ्या पुन्हा एका ट्रॅक्टरला पकडले एकूण या पाचही ट्रॅक्टर वर कार्यवाही करून सदर ट्रॅक्टर गोंडपिपरी पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आल्या.

गुरुवार ला पहाटेच्या कार्यवाही नंतर शुक्रवारी महसूल विभागाचा अहवाल पोलिसांना सादर करण्यात आला. तसेच महसूल विभागाच्या प्राप्त माहितीनुसार सदर ट्रॅक्टर संतोष बंडावार, सचिन चौधरी, सुजाता चुनारकर मनोज मेडपल्लीवार. इत्यादी या नामनिर्देशीत वाहनमालकाचे असून, गोंडपिपरी पोलिसांकडून सदर प्रकरणी तपास सुरू आहे. आणि पुढील कार्यवाही गोंडपिपरी पोलीस प्रशासनामार्फत केली जाणार आहे.

गोंडपिपरी तालुक्यामध्ये. रेती तस्करी दारु तस्करी,बियाने तस्करी जास्तीत जास्त वाढलेली आहेत. यात प्रशासनाचा हात तर नाही ना….! या तस्करी मुळे गोंडपिपरी तालुक्यात देखील हत्याकांड होणारं नाही ना..? बल्लारशा, राजुरा ,वरोरा इत्यादी शहरांमध्ये गोळीबार हत्याकांड होत आहेत ते या तस्करी मुळेच होत आहेत .समोर जाऊन तालुक्यात सुद्धा अशी घटना घडेल की काय या गोष्टीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. रात्री बेरात्री दिवसभर रेतीचे ट्रॅक्टर हायवा मोठ मोठ्या गाड्या भरून गावामधून वेगाने जात असतात.गाड्यांच्या कर्कश आवाजा मुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अश्या अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी आळा बसावा अशी समस्त तालुका वासियांची मागणी आहे.