डॉ‌. ॲड, एकनाथराव साळवे यांची जयंती संकल्प दिन म्हणून साजरी…

298

राकेश कडुकर (राजुरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी)

राजुरा: स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा क. महाविद्यालय राजुरा येथे दि. 30 मार्च ला शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, वंचितांचे नेते एन्काऊंटर चे कादंबरीकार तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ‌. ॲड, एकनाथराव साळवे यांची जयंती कोरोना वैश्विक महामारीचे नियम पाडून संकल्प दिन म्हणून साजरी करण्यात आली.

               कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एकनाथ साळवे यांचेवर आधारित गौरवगिताने करण्यात आली. गोरगरीब, आदिवासी व कष्टकरी यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी राजुरा येथे मराठी माध्यमाची शाळा बहुजनांचे नेते महात्मा ज्योतिबा फुले यांचे नावाने काढली, तर बल्लारपूर येथे विविध भाषिकांची मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी हिंदी, ऊर्दू, तेलंगु शाळा काढली. त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेली कामगिरी जनतेच्या नेहमी स्मरणात राहील असे विचार श्री. सुभाष ताजने यांनी व्यक्त केले. तर डॉ. एकनाथ साळवे यांच्या जिवनपटावर श्री. संजय निखाडे यांनी प्रकाश टाकले. श्री. राजबिंद्र डाहुले व श्री. मोहनदास मेश्राम यांनीही आपले विचार व्यक्त केले.           

            कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर उईके, प्रमुख अतिथी ग्रा. स. शि. पं. मंडळाचे सचिव तथा ग्रा. पं. बामणीचे सरपंच श्री. सुभाष ताजने, पर्यवेक्षक श्री. डि. लक्ष्मणराव, जेष्ठ शिक्षक श्री. अशोक चिडे, श्रीमती मालती उरकुडे यांची उपस्थिती होती.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगला गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. मोहनदास मेश्राम यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.