विरुर स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य…

368

राकेश कडुकर
राजुरा ग्रामीण प्रतिनिधी

राजुरा: राजुरा तहसील मध्ये सर्वाधिक मोठी अशी नोंद असलेली ही ग्रामपंचायत विरुर स्टेशन आहे.
मात्र इथे बेसिक सुख सुविधांचा फार मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
मुख्य रस्त्याची लागलेली वाट, रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असे अनुभव सध्या विरुर स्टेशन मध्ये बघायला मिळत आहेत. पंचक्रोशीतून येणाऱ्या तसेच विरुर गावातील नागरिकांना वाढत्या प्रदूषणामुळे नाहक त्रास होत आहे.
2019 मध्ये आदर्श युवा मंडळ विरुर यांच्या पुढाकाराने मुख्य रस्त्याची खड्डा भरणी करण्यात आली परंतु कालांतराने तेही निघून गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे व बाहेरून येणाऱ्या नागरिकांना तसेच गावातील नागरिकांना रोज धुळीचा सामना करावा लागत आहे.