Home चंद्रपूर अभिनंदन! पोंभुर्णा पंचायत समीतीला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार...

अभिनंदन! पोंभुर्णा पंचायत समीतीला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार…

महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.माझी मूख्यमर्ती यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील आदर्श पंचायत राज संस्थेची संकल्पना साकार व्हावे या हेतूने ग्रामविकास विभागाकडून राज्यस्तरावर पंचायत राज पुरस्कार प्रदान करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकाभिमुख कार्य करणारी पोंभुर्णा पंचायत समीती यशवंत पंचायत राज अभियानात नागपूर विभागात उत्कृष्ठ कार्य करुन द्वितीय पुरस्कार प्राप्त ठरली. विशेषता जिल्ह्यातील पहिली आय.एस.ओ नामांकित ही पंचायत समीती असून या पुरस्कारामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
७३ व्या घटनादुरुस्तीनंतर पंचायत राज संस्थांना मिळालेल्या अधिकारामुळे ग्रामिण भागातील शेवटच्या माणसाला सत्तेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या अनुषंगाने पोंभुर्णा पंचायत समीतीने सन २०१९-२० सत्रात अधिकाधिक लोकाभिमुख कार्य मुख्य कार्यकारी आधिकारी राहूल कर्डीले, पंचायत समीती सभापती अल्काताई आत्राम, गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपुर्ण परिश्रमाने हा पुरस्कार मिळविला आहे.
महाराष्ट्र राज्यात आदर्श गांव म्हणून पुरस्कार प्राप्त ठरले असून नुकतेच जिल्हा स्मार्ट व सुंदर ग्राम पुरस्काराने सन्मानित झाले आहे. ग्रामपंचायत आष्टा पंचायत सशक्तीकरण अभियानात देशात अव्वल आले आहे. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत पेपरलेस झाल्या असून ११ ग्रामपंचायती व ७४ अंगणवाडी केंद्रांना आय.एस.ओ मानांकन मिळाले असून पारदर्शी प्रशासनाचे हे निकष आहेत. पोषण चळवळ उत्कृष्ठ राबविल्याने कुपोषणमुक्त तालुका होण्याचे चित्र आहे. नरेगा व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेली कामे ग्रामीण विकासाला दिशादर्शक ठरली आहे. पंचायत समिती स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे, शुध्दजल, अभ्यागतकक्ष, स्वच्छता संदेश, योजना फलकचे निर्माण करण्यात आल्याने ग्रामीण नागरिकांना दिलासा मिळत आहे. कर्मचाऱ्यांत उत्साह कायम राहावा म्हणून नियमितपणे विविध उपक्रमशिल कार्यक्रमाचे आयोजन होत असून कार्यसंस्कृतीची बिजे रुजली आहे. यातून कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीत वाढ झाल्याचे दिसून येते.
कोरोनाचा व्यापक प्रचार व प्रसार व्हावा व जनतेत जागृत्ती व्हावी हा हेतु ठेऊन ‘माझे कुटूंब,माझी जबाबदारी’ वर आधारित संदेशात्मक ‘आरोग्यावर बोलू काही’ पुस्तक प्रकाशित करणारी महाराष्ट्रातील पहिली पंचायत समिती ठरली आहे. या अभियानात जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, शिक्षकवर्ग, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व मदननिस, ग्रा.प.कर्मचारी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होवून सर्वोतोपरी सहकार्य केल्याने पंचायत राज अभियानात गौरवाची मानकरी पंचायत समिती ठरली आहे असे पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी सांगितले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

ओबीसी योद्धा उतरला गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीच्या मैदानात… प्रा.अनिल डहाके सह सेक्युलर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी केला निवडणूक अर्ज दाखल…

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर: येत्या ०४ सप्टेंबर २०२२ ला गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक असून अनेकांची नजर या निवडणुकीवर आहे. परंतू या...

माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने दुर्गापूर मध्ये अन्नधान्य किटचे वितरीत

चंद्रपुर: जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले, त्यामुळे अनेकांच्या घरचे अन्न धान्य खराब झाले त्याच सोबत अति...

राज्यपाल भगतसिंह ‘कोशियारी’ यांना राष्ट्रवादी युवक काँग्रसने पाठविले १० हजार पत्र.

चंद्रपूर :- घटनात्मक पदावरील व्यक्तीवर खटला दाखल करता येत नाही म्हनून सातत्याने आगाऊ, असंवेदनशील, मूर्खपणाचे, अविवेकी, बेताल, प्रक्षोभक, राजकारनाने प्रेरित वक्तव्य व वागणूक राज्यपाल...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

सोमवार दि. ८ ऑगस्ट २०२२ सकाळी ८.०० वाजता -: नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण सकाळी १०.०० वाजता -: शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस),चंद्रपूर येथे आगमन व राखीव सकाळी ११.०० वाजता -:...

वंचित बहुजन आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश

ब्रम्हपुरी :- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्षच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो ही भावना नागरिकांमध्ये...

रस्ता दुरुस्त केल्याशिवाय धानाची उचल करू देणार नाही वॉर्ड नंबर तीन मधील महिलांचा आक्रोश

ब्युरोचीफ प्रशांत शाहा गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील नवीन महामंळाचे गोडाऊन मधून मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाची उचल केल्या जात आहे. गोडाऊन कडे जाणार मार्ग...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

शनिवार दि. ६ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.०० वाजता -: नागपूर येथून गडचिरोली कडे प्रयाण सकाळी ९.३० वाजता -: "रानफुल' निवासस्थान पोटेगाव रोड गडचिरोली येथे आगमन व राखीव सकाळी १०.३० वाजता -:...

Recent Comments

Don`t copy text!