नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या चट्टेरी वन घुबडाला जिवनदान…

560

नितेश खडसे (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली : येथे नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या चट्टेरी वन घुबडाला जिवनदान देण्यात आले . गडचिरोली येथील पोटगाव मार्गावरील मुख्य वनसंरक्षक यांच्या निवास्थानी असलेल्या झाडावर चट्टेरी वनघुबड नायलाॅन मांजामध्ये अडकलेल्या अवस्थेत काहि नागरिकांना आढळले. याबाबत वनविभाला माहिती देण्यात आली असता वन विभागाने पेसा (People For Environment and Safeguarding Animals) संस्थेच्या सदस्याना सदर माहिती दिली. लगेच पेसा (PESA) (People For Environment and Safeguarding Animals) संस्थेचे अजय कुकडकर, मनोज पिपरे, चेतन शेडे यांनी घटनास्थळी धाव घेत झाडावरील चट्टेरी घुबडाला पकडून नायलाॅन मांजामधून सुटका केली व दुखापत नसल्याने त्याला जंगल परिसरात सोडून जिवनदान देण्यात आले. यावेळी मुकेश लांजेवार, अनिल हुलके, उत्तम हुलके, प्रफुल राऊत, प्रकाश कोहचडे, शेखर म्हशाखेत्री यांनी सहकार्य केले.
नायलाॅन मांजावर बंदी असतांना सुध्दा नायलाॅन मांजाची छुप्या मार्गाने विक्री जोमात सुरु आहे. नायलाॅन माजांने अनेक छोटया मोठया घटना घडल्या आहेत. कधी प्राणी,पक्षी तर कधी मानवाला सुध्दा नायलाॅन मांजाचा आघात झालेला असतांना सुध्दा नायलाॅन मांजाची सऱ्हासपणे विक्री केल्या जात आहे. तरी अवैध नायलाॅन मांजाविक्रीवर अंकुश लावणे गरजेचे असुन नायलाॅन मांजाचा वापर टाळावा असे आवाहन पेसा ( PESA ) (People For Environment and Safeguarding Animals) संस्थेच्या सदस्यांनी केले आहे.