स्व.शांताराम पोटदुखे यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न…

407

सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित, व गोंडवाना विद्यापीठ ,गडचिरोली संलग्नित सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क चंद्रपूर व नवयुवक मंडळ ,गुरुदेव सेवा मंडळ जामणी बजरुक ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शांताराम पोटदुखे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री,( भारत सरकार) यांच्या जयंतीच्या अवचितत्याने महाविद्यालयाने कोविड 19 या संकट काळात गेल्या सहा महिन्यापासून हे 10 वे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे .

समाजकार्य महाविद्यालयाने या कोविड काळामध्ये विद्यार्थी ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे. व त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आमच्या महाविद्यालयाने विविध ठिकाणी लॉकडॉऊन शाळा, रक्तदान शिबिरे ,मास्क वाटप,प्रशासकीय योजनेची जनजागृती विविध कार्यक्रमाचे आयोजन गेल्या काही महिन्यापासून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आयोजित केले गेले.

आज दिनांक 1 फेब्रुवारी 2021 ला जामणी गावांमध्ये रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. सकाळी आठ वाजता गावामध्ये शाळेतील विद्यार्थी सह प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिर झाले या आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. बालमुकुंद पालीवाल डॉ. पूजा पट्टीवार, डॉ. अभी परिहार, महाविद्यालयाचे रा. से. यो. समन्वयक प्रा. डॉ. सुभाष गिरडे,प्रा. विश्वनाथ राठोड, प्रा. संतोष आडे, प्रा. किरणकुमार मनूरे आदी उपस्थित होते.

गावातील महिलांना विविध रोगाविषयी जनजागृति माहिती व मार्गदर्शन, लहान मुलांच्या आरोग्याची घ्यायची काळजी व मार्गदर्शन, त्यानंतर महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी संपन्न झाली .गावातील नवयुवक मंडळ येथिल तरुण युवकांनी रक्तदान शिबिर आयोजित केले. त्यामध्ये जवळजवळ 35 युवकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,चंद्रपूर येथील रक्तसंक्रमण अधिकारी व त्यांची सर्व टीम उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी आयोजन व नियोजन महा. विद्यार्थ्यांनी कु. प्रतीक्षा दुपारे, श्री.हर्षल खंडाळकर श्री. अनिकेत दुर्गे, श्री. युवराज बांबळे, श्री हर्षल काळमेघे, कू. अचल शेंडे इत्यादी विद्यार्थ्यांनी पार पाडली. या गावातील शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर कानकाटे, श्री. माणिकराव बोबडे, श्री. आनंदराव वराडकर, श्री. शंकरराव दातारकर, श्री हरिभाऊ आमने,, श्री फुलभोगे, श्री. पवार श्री. शिवणकर सौ.
मिलमिले, डोंगरकर मॅडम,आयोजक रक्तदाते व नव युवक मंडळाचे पदाधिकारी श्री अनिकेत वासेकर, शुभम वासेकर, श्री राजकुमार गोरकर, श्री शुभम बदकल श्री अशीष दारु डे, अनेकेत जेऊरकर ,श्री.सुनील गुजरकर श्री मयूर कासवटे,श्री रोषण वराडकर ,श्री संदेश वासेकर, श्री वैभव देठे यांनी हे शिबिर यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले.