Homeचंद्रपूरपोंभुर्णासामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीकांत शेंडे यांचा सत्कार...

सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीकांत शेंडे यांचा सत्कार…

मुल- गेल्या १० वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पोंभुर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शेंडे यांचा मूल येथे सत्कार करण्यात आला. मा.सौ.शशिकला ताई गावतुरे यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा काल कन्नमवार सभागृह, मूल येथे पार पडला होता. त्या प्रसंगी श्रीकांत शेंडे यांचा सत्कार झाला.

श्रीकांत शेंडे यांनी पोंभुर्णा तालुक्यात गेली 10 वर्षांपासून वन्यजीव संरक्षण, सर्पमित्र म्हणून काम बघत आहेत. सोबतच लॉक डाऊन च्या काळामध्ये गरजू नागरिकांना अन्न धान्य किट वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन करून एक सामाजिक जबाबदारी समजून काम केले. तसेच इतर सामाजिक कार्यात योगदान करीत असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर मा.शंकररावजी लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ, माजी आमदार देवराव भांडेकर सर, चंद्रपुरातील नामवंत विधितज्ञ मा.पुरुषोत्तम सातपुते सर, सौ.शशिकला गावतुरे, नामदेवराव गावतुरे व इतर मान्यवर उपस्थित होते..

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!