भक्तांचा मार्ग सूकर होणार; पोडसा-धाबा मार्गातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू…

0
320

गोंडपिपरी-संत परमहंस कोंडय्या महाराज यांच्या जयंती दिनी मोठ्या प्रमाणात भक्त धाबा गावी येतात.तेलंगणातूनही भक्तांचा ओघ असतो.मात्र हीवरा-पोडसा मार्गाचे बांधकाम सूरू आहे.मार्गात शेकडो खड्यांनी डोके वर काढले आहेत. हे खड्डे प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. भक्तांचा प्रवास सूकर व्हावा यासाठी मार्गातील खड्डे बुजविण्याचे कार्य सूरू आहे.

महाराष्ट्र-तेलंगणातील भक्तांचे आराध्य दैवत श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांची जन्म जयंती येत्या 14 फेब्रुवारीला आहे.कोरोनाचा पार्श्वभूमीवर यात्रा महोत्सव स्थगीत करण्याचा हालचाली वाढल्या आहेत.मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही.यात्रा स्थगित झाली तरी महासमाधीचे दर्शन घेण्यासाठी दुरवरून भक्त हजेरी लावणार आहेत.

मात्र भाविकांचा भक्तीत मार्गातील खड्यांचा मोठाच अडथळा निर्माण झाला आहे.हीवरा ते पोडसा,गोंडपिपरी ते धाबा मार्गात शेकडो खड्डे आहेत. या खड्यामुळे अपघातांची दाट शक्यता आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गातील खड्डे बुजविण्याचे कार्य हाती घेतले आहे.गुरबक्षानी कंपनीचे मार्ग बनविण्याचे काम सूरू आहे.समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांचा मार्ग सूकर करण्यासाठी कंपनी मार्गातील खड्डे बुजवित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here