डोंगरगाव येथील लोकांपुढे तिहेरी संकट…

826

-राजेंद्र झाडे प्रतिनिधी

गोंडपिपरी: धाबा येथून जवळच असलेल्या डोंगरगांव येथील लोकांपुढे सध्या तिहेरी संकट निर्माण झाले आहे. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. अश्यातच हाताला काम धंदा नसल्याने अनेकांच्या पोटाला ताळे बसले होते. गोर-गरिबांना थोडी मदत व्हावी म्हणून विज-बिल माफ करण्यात यावे अशी अनेकदा प्रशासनाला निवेदने देऊनही विज बिल माफ झाले नाही.

प्रशासनाकडे आशेने बघत असलेल्या लोकांनी विज बिल माफ होईल म्हणून लोकांनी विजबिलाचा भरणा केला नाही. पण आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडुन विज बिल भरण्यासाठी नोटीस प्रत्येक ग्राहकांना बजावली जात आहे.

एका-एका ग्राहकांना हजारो रुपये बिल आले असून एवढी मोठी रक्कम आम्ही वीज बिल म्हणून कुठुन भरणार याची चिंता सामान्य लोकांना सतावत आहे. वरून ग्रामपंचायत घर टॅक्स भरण्याची नोटीस पाठवत आहे.

येवढ संकट एकावेळी लोकांवर आल्यामुळे आम्ही विज बिल भरायचं की घरटॅक्स भरायचं की मग आमचं कुटुंब जगवायचं अश्या हा संतप्त प्रतिक्रिया लोकांकडून मिळत आहे….