शेखर बोनगिरवार जिल्हा प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीची रनधुमाळी सुरु होती. चंद्रपुर जिल्ह्यात दमदार व कनखर नेतृत्व असलेले राज्याचे मद्त व पुनर्वसन, बहुजन कल्याण, आपत्ति व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडिने ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या होत्या. आज निवडणुकीचा निकाल हाती येताच दोन्ही जिल्ह्यात काँग्रेस व महाविकास आघाडीचे ७० ते ८० टक्के उमेदवार विजयी झाले आहे.
चंद्रपुर जिल्ह्याचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकीत रणनीति आखुन निवडणुकीत रनसिंग फुंकले, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोमाने प्रचारात उतरले. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सर्वच महाविकास आघाडिचे उमेदवार विजयी झाले असून अनेक ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्राप्त केली आहे.
या प्रसंगी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज्यात महाविकास आघडीची सत्ता येवून एक वर्ष पूर्ण झाली. महाविकास आघाडिने गेल्या वर्षभरात जनतेच्या हिताचे निर्णय घेवून काम केले आहे, करीत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेनी कांग्रेसला महाविकास आघाडिच्या उमेदवाराना प्रचंड मतानी विजयी केले आहे. आज राज्यात काँग्रेस पक्ष एक नंबर वर विजयी झालेला असून चंद्रपुर जिल्हात ७५ ते ८० टक्के ग्रामपंचायतीवर कांग्रेस महाविकास आघाडिचा झेंडा फड़कलेला आहे असे प्रतिपादन त्यांनी केले