गोंडपिपरी तालुका ग्रामपंचायत निकाल; 43 पैकी 23 ग्रामपंचायतची सूत्रे भाजपाकडे तर 20 ग्रा पं वर काँग्रेसचा वरचष्मा…!

0
744

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) कार्यकारी संपादक

आज जाहीर ,झालेल्या निकालानुसार तालुक्यातील एकूण 43 ग्रामपंचायत पैकी 23 ग्रामपंचायतवर भाजपने तर 20 ग्रामपंचायतवर काँग्रेसने झेंडा फडकावल्याचा दावा त्या त्या पक्षांनी केला आहे .
भाजपचे तालुकाध्यक्ष बबन निकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,तालुक्यात एकूण निवडून आलेल्या 337 सदस्यांपैकी भाजपचे 178 सदस्य आहेत .भंगाराम तळोधी ,धाबा या मोठया ग्रा पं सह 43 पैकी 23 ग्रामपंचायतवर भाजपाने झेंडा रोवला आहे . भाजपने पहिल्यांदाच उमेदवारांचे पॅनल तयार केल्याचे त्यांनी सांगितले .
मागील निवडणुकीत भाजपकडे 17ग्रा पं होत्या यावेळी 23 म्हणजे 6ग्रा पं अधिक आल्याचा त्यांचा दावा आहे .
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ..संपर्क झाला नाही . काँग्रेसच्या वासू नगारे यांनी गाववाईज दिलेल्या माहितीनुसार ,43 पैकी 21 ग्रामपंचायतवर काँग्रेसचा वरचष्मा आहे .लाठी ,तोहोगाव ही मोठी गावे काँग्रेसकडे आली आहेत .मागील निवडणुकीत काँग्रेसकडे 18ग्रामपंचायत होत्या ..यावेळी 21 म्हणजे 3 अधिकच्या ग्रामपंचायत काँग्रेसकडे आल्याचा त्यांचा दावा आहे .
या निवडणुकीत काही रथी महारथींना मतदारांनी सपाटून आपटले आहे ..! कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ,संजय गांधी निराधार योजनेचे विद्यमान अध्यक्ष काँग्रेसचे विनोद नागपुरे हे नंदवर्धन ग्रामपंचायत निवडणुकीत सपाटून आपटले ! भाजपच्या संजय सांगडे यांनी त्यांचा पराभव केला .
तालुका काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष गौतम झाडे यांची अनेक वर्षापासूनची सत्ता मतदारांनी संपुष्टात आणली .
चक्रबोरगावमध्ये त्यांच्यासह त्यांचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही .
भाजपचे पं स चे माजी उपसभापती ,विद्यमान सदस्य ,पत्नी सरपंच असतानाही मनिष वासमवार यांना जबर पराभवाचा धक्का बसला .
धाबा येथील काँग्रेसचे माजी सरपंच नामदेव सांगडे , काँग्रेसचे राजुरा विधानसभा प्रमुख सचिन फुलझेले यांचाही निवडणुकीत दारुण पराभव झाला .विधानसभा प्रमुख थेट 4थ्या नंबरवर फेकल्या गेल्याचे कळते …!
प्रथमतःच वंचित बहुजन आघाडीचे तोहोगावात 4 उमेदवार निवडून आले आहेत .

राष्ट्रवादीचे तालुकाध्य्क्ष राजेश कवठे यांनी परत वढोलीत आपला प्रभाव सिद्ध केला .त्यांचे 6उमेदवार निवडून आले आहेत .त्यांच्याच पक्षाचे कार्याध्यक्ष नितेश मेश्राम हे नवेगाव (वाघाडे )येथून निवडून आले आहेत .त्यांच्याच पक्षाच्या किसान सेल चे अध्यक्ष आकाश चौधरी यांची पत्नी शीतल यानी विहीरगावातून बाजी मारली आहे .
चंद्रजीत गव्हारे, राजेंद्र झाडे, समीर निमगडे हे बातमीदारही अक्सापुर , डोंगरगाव, करंजीतूून जिंकले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here