जिल्ह्यात दारूबंदी असतांनाही दारूचा महापूर वाहतो कसा?

779

नागेश इटेकर
गोंडपिपरी , तालुका प्रतनिधी

गोंडपिपरी – तालुक्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडॉऊनमध्ये शिथीलता येताच शासनाने ज्या जिल्ह्यात दारु बंदी नाही तिथे सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना काही अटी व शर्तीच्या अधीन राहून दारू विक्रीला रीतसर परवानगी दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पाच वर्षापासून दारूवर कायमस्वरूपी बंदी आहे. असे असतांनाही दारूचा कुटिर व्यवसाय तेजीत आणि राजरोसपणे सुरू आहे. यामुळे अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत.अठरा ते वीस वयोगटातील तरुण पोरं नशेच्या आहारी गेले, शिवाय विषारी दारूच्या सेवनाने मृत्यू पावनार्यांची संख्या सुद्धा वाढली आहे . पोलिसांकडून दारू पकडण्यात येत असल्याचे सांगण्यात येते, कार्यवाया देखिल करत असल्याचे सांगण्यात येते असे असतांना मग प्रत्येक गावात दारूचे पाट कसे काय वाहत आहे..? असा सवाल तालुक्यातील नागरिकांकडून केला जात आहे.

गोंडपिपरी , भं. तळोधी , धाबा , गोजोली इत्यादी प्रमुख गावात कायदा व सुव्यवस्थेला झुगारून गल्लोगल्लीत आणि मोठया प्रमाणात दारू विक्री होत असते. हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येत नसेल का..? येत असल्यास मग बघ्याची भुमिका काहून..? दोघांमध्ये काही साटेलोटे तर नाही. अशी शंका जनमानसात निर्माण होत आहे.