HomeBreaking Newsसामाजिक वनीकरण विभागात खळबळ! महिला अधिकाऱ्यांसोबत विभागीय वनाधिकाऱ्याचे अश्लील कृत्ये...

सामाजिक वनीकरण विभागात खळबळ! महिला अधिकाऱ्यांसोबत विभागीय वनाधिकाऱ्याचे अश्लील कृत्ये…

शेखर बोनगीरवार (जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपुर: गेल्या तीन वर्षांपासून एका महिला अधिकाऱ्यावर सतत अत्याचार व अश्लील कृत्ये करणाऱ्या सामाजिक वनीकरणच्या विभागीय वनाधिकारी शरद करे यांच्यावर स्थानिक रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी आपल्या विभागातील महिला अधिकाऱ्यांना तुमचा अहवाल वाईट आणि खराब देईल व वरच्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला निलंबित करेल अश्या धमक्या देऊन त्यांच्यावर अत्याचार करत आले.

करे यांच्या अश्या सततच्या वाईट कृत्याला कंटाळून एका महिला अधिकाऱ्यांनी त्यांची पोलीस तक्रार पोलीस स्टेशन, रामनगर मध्ये दाखल केली. त्याच्यावर भांदवि ३५४, ३५४(अ), ३५४(ब) व ५०६ कलमांअंतर्गत गुन्हे करण्यात आले आहे.

सामाजिक वनीकरण विभागात विभागीय वनाधिकारी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून शरद करे नामक अधिकारी आहे. त्याच विभागात राजपत्रित गट-ब पदावर एक महिला अधिकारी आहे. या महिला अधिकाऱ्यावर गेल्या तीन वर्षांपासून शरद करे हे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होते.

आपल्यापेक्षा वरच्या पदावर असल्यामुळे महिला अधिकाऱ्यांनी अनेकदा त्यांच्या समज काढण्याचा प्रयत्न केला. परंतु करे यांचे अश्लील कृत्य काही कमी होण्याचे नाव घेत नव्हते. करे नेहमीच महिला अधिकाऱ्यांवर वाईट नजर ठेवून टपून बसले होते.
महिला अधिकाऱ्याच्या घरची करे संगणक परिचालकद्वारे नेहमी चौकशी करायचे.

महिला अधिकाऱ्यांचे पती हे व्यावसायिक कामानिमित्त बाहेर असायचे, पंधरा-वीस दिवसातुन दोन-तीन वेळा ते घरी यायचे. ही गोष्ट लक्षात आल्यावर करे पुन्हा महिला अधिकाऱ्यांला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकावीत होते.

नुकतंच ५ जानेवारी ला महिला अधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या सुट्टीसाठी अर्ज करून रजेवर होत्या. परंतु रजेवर असतांना देखील करे यांनी कार्यालयातून भ्रमणध्वनी करून महिला अधिकाऱ्याला आपल्या कॅबिन मध्ये बोलावून घेतले.
वरिष्ठ अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी आल्याने महिला अधिकारी करे यांच्या कॅबिन मध्ये गेल्या.

कॅबिन मध्ये त्या दोघाव्यतिरिक्त कुणीही नसल्याने करे यांनी महिला अधिकाऱ्यांला अश्लील व्हिडीओ दाखवून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंमतीने महिला अधिकारी कॅबिन मधून बाहेर पडल्या. त्यानंतर घरी येऊन त्यांनी आपल्या बाहेरगावी असलेल्या पतीला बोलावून घेऊन त्यांनी सामाजिक वनीकरण वनाधिकाऱ्यावर रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली.

तक्रार नोंदवुन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश हाके करीत आहेत. सदर घटना अत्यंत निंदनीय असून वन विभागाला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!