स्वस्त धान्य दुकानदाराकडून शासकीय नियमांना तिलांजली, मनमानी कारभार…

638

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) कार्यकारी संपादक

बहुतांश स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य वितरण प्रणाली संदर्भात असणाऱ्या शासकीय नियमांची पायमल्ली होत असून त्यांनी मनमानी कारभार चालवला असल्याच्या तक्रारी आहेत .
प्रस्तुत प्रतिनिधीने माहितीच्या अधिकारांतर्गत यासंदर्भात माहिती मागितली .प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ,स्थानिक परिस्थितीनुसार कार्ड धारकांच्या सोयी विचारात घेऊन प्रत्येक स्वस्त धान्य दुकाने सकाळी 4तास आणि दुपारी 4तास निश्चितपणे उघडी ठेवण्यात यावीत .असे नियम सांगतो .
स्थानिक कार्ड धारकांच्या म्हणण्यानुसार ,केवळ चार दिवस 4 तासच धान्य वितरण केले जाते .केवळ चार दिवस धान्य वितरण केले जावे असा कुठलाही
नियम नाही .
ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतो अशा ठिकाणी बाजाराच्या दिवशी पूर्ण वेळ दुकानें उघडी ठेवण्यात यावी असे नियमात नमूद आहे .
दुकानदाराकडून हा ही नियम धुडकावला जात आहे .
स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांना पावती देणे बंधनकारक आहे . अशी पावती दिली जात नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे .
शासकीय नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करणाऱ्या दुकानदारांना प्रशासनाने नियमांची जाणीव करून देऊन लाभार्थ्यांचे हित जपावे अशी मागणी आहे .