जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली: गडचिरोली आगारात पर्यटकांसाठी एक नवी योजना एसटी महामंडळ राबवित आहे. यात दर शनिवार,रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक स्थळी विशेष गाडी सोडण्याची योजना तयार केली गेली आहे. यात गोसेखुर्द, घोडाझरी, गायमुख, नवेगावबांध, कमलापूर हत्ती कॅम्प अश्या अनेक पर्यटक स्थळा करिता विशेष बस सुरू करण्याचे निर्णय गडचिरोली आगाराकडून करण्यात आली आहे.
या उपक्रमात हीच सेवा चामोर्शी तालुक्यातील घोट गार्डन व रेगडी येथिल कर्मवीर कन्नमवार इको पार्क साठी पण बस सेवा सुरू करावी अशी मागणी घोट रेगडी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.






