Advertisements
चंद्रपूर, दि. 4 जानेवारी : सामाजिक न्याय व विषेश सहाय्य विभाग यांचे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जेष्ठ नागरिक योजनेंतर्गत वयोवृध्द व्यक्तीचे आयुष्य कसे आनंदी करता येईल याविषयावर 30 व्यक्तींकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
Advertisements
सदर प्रशिक्षणांतर्गत जेष्ठत्वाची ओळख, जेष्ठ व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या व उपाययोजना, जेष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्यांची व योजनांची ओळख याबाबत सावली, सी.एफआर, हेल्पेज इंडिया, फेस्कॉम व एएससीओपी या संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी भ्रमणध्वनी /व्हॉटसॲप 9860964323 नंबरवर नोंदणी करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.
Advertisements
Advertisements