गोंडपिपरीत वाहतूक व्यवस्था विस्कळीत…!

0
476

गोंडपिपरी (सुनील डोंगरे )-कार्यकारी संपादक –

गोंडपीपरी हाय वे सडकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे .मात्र सडकेवर गतिरोधक दिसत नाहीत .यामुळे वाहनधारक सुसाट वेगाने दिसेल त्या वाटेने वाहने दमटत असल्याने अपघात घडताहेत .वाहतूक पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे .
चंद्रपूर -आलापल्ली हा मार्ग हाय वे झाला आहे .नूतन सडकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे .ही फोर लेन सडक आहे .अगदी चकचकीत सडक तयार झाली आहे .तथापि सध्या कुठेही गतिरोधक बसवण्यात आलेले दिसत नाहीत .
जुना बस स्टॅन्ड ,नवीन बस स्टॅन्ड ,जनता हायस्कूल पंचायत समिती याकडील सडकेवर गतिरोधकांची नितांत गरज आहे .
गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने वाहने पळताना दिसतात .जुना बस स्टॅन्ड परिसर गजबजलेला परिसर आहे .मुख्य बाजारपेठ याच ठिकाणी आहे .इथली वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे .इथे वाहतुकीला कुठलीही शिस्त नाही ..!छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत .
इथे वाहतूक पोलिसांची ड्युटी लावणे अत्यंत गरजेचे आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here