पंचायत समिती राजुरा येथे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन…

0
98

राजुरा (ता.प्र) :– दिनांक १८ डिसेंबर
पंचायत समिती राजुरा येथे रक्तदान शिबीरेचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्दघाटन आमदार मा श्री सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या महाराष्ट्रात रक्त पुरवठा कमी पडत असून रक्त पुरवठा सुरळीत व्हायला हवा यासाठी विविध संस्था पुढे येऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहेत. याच उदात्त हेतूने राजुराचे गट विकास अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीराचे आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी पंचायत समिती सभापती मुमताज अब्दुल जावेद, श्री विजय पचारे गट शिक्षणाअधिकारी, श्री अमित महाजनवार विस्तार अधिकारी, श्री महेंद्र डाखरे तालुका कृषी अधिकारी, श्री साहेबराव पवार विस्तार अधिकारी, श्री संजय हेडाऊ विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पंचायत समिती कर्मचारी, महिला, यांनी रक्तदान केले.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here