राजुरा: लोकनेते श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्यां वाढदिवसानिमित्त राजुरा तालुका व शहर रोहित दादा पवार विचारमंच व साईनगर मित्रमंडळ राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्थानिक हनुमान मंदिर, साईनगर, शिवाजी वॉर्ड राजुरा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. शहरातील व साई नगर वार्डातील मोठ्या संख्यने युवकांनी रक्त दान केले. रक्तदान शिबिर रोहित दादा पवार विचार मंच चे तालुका अध्यक्ष सुजित कावळे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले तर शिबिराचे उदघाटन आनंदराव ताजने यांनी केले यावेळी राजुरा तालुका रा. काँ. अध्यक्ष संतोष देरकर, राजुरा शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, राजुरा युवक तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद, युवक शहराध्यक्ष स्वप्नील बाजुजवार, रो.दा. वि. मं. शहराध्यक्ष ऑस्टिन सावरकर, शहर उपाध्यक्ष रखिब शेख, राजू ददगाळ, संघटक सचिव संदीप पोगला, महासचिव अंकुश भोंगळे, गौरव वासाडे, निहाल माथनकर, अंकुश कायरकर, यश मोरे, प्रतिक कावळे, आदित्य धोटे,राहुल वणकर, उत्पल गोरे,भूषण रागीट, प्रज्वल ढवस व नयन सुर्यवंशी, तसेच चंद्रपूर जिल्हा रुग्णालय चे वैधकिय समाजसेवा अधीक्षक श्री. पंकज पवार, रक्तपेढी तंत्रण्या श्री. जय पाचारे, परिचर श्री. योगेश जारुंडे,कृतीका गडागेलवार, दीक्षा डोंगरे, साहायक लक्ष्मण नगराळे व वाहन चालक रुपेश घुमे उपस्थित होते.
Advertisements
Advertisements
Advertisements