रक्तदान करत युवकांनी केला पालकमंत्री वडेट्टीवारांचा वाढदिवस साजरा…

0
170
Advertisements

शेखर बोंनगीरवार (तालुका प्रतिनिधी)
गोंडपिपरी: यंदा कोरोनाने अवघे मानवजीवन विस्कळीत झाले.अशावेळी सर्वसामान्यांना आधार देणे गरजेचे आहे.यामुळे राज्यशासनाने देखिल रक्तपेढी वाढविण्यासाठी रक्तदान करण्याचे आव्हाहन केले.ही बाब लक्षात घेत गावच्या भुमिपुत्राच्या वाढदिवसानिमित्त करंजी गावासह परिसरातील युवकांनी स्वयंनस्पुर्तीने रक्तदान करित जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवारांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.काँग्रेसचे जिल्हा सचिव कमलेश निमगडे यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे १२ डिसेंबर रोजी करंजीत आयोजन करण्यात आले होते.

राज्याचे मदत पुनर्वसन,बहुजन कल्याणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची करंजी ही जन्मभुमी आहे.करंजी गावात त्यांचे बालपण गेले.वडेट्टीवारांचे वडिल गावचे सरपंच होते.यामुळे वडेट्टीवारांची नाळ करंजी गावाशी जुळली आहे.अधून मधून ते मिळेल त्या निमित्ताने गावात येत असतात.अश्यातच १२ डिसेंबर त्यांचा वाढदिवस.या दिवसाचे निमित्त साधत गावातील युवकांचे सामाजिक संघटन असलेल्या “विजय वडेट्टीवार फॅन्स क्लबने” रक्तदान शिबिराचे आयोजन केले.यात करंजीसह परिसरातील ४२ युवकांनी रक्तदान करत वडेट्टीवारांचा वाढदिवस साजरा केला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोंडपिपरी तहसिलदार के.डी.मेश्राम,उद्घाटक बाजारसमितीचे सभापती सुरेश चौधरी,राजिवसिंह चंदेल,गौतम झाडे,गोंडपिपरी यंग ब्रिगेड अध्यक्ष सुरज माडुरवार,नगरसेक निरज चाफले,पत्रकार समीर निमगडे,चंद्रजित गव्हारे,अस्लम शेख,आशिष निमगडे,राजू झाडे,दिलीप गुरनूले,दिलीप वासेकर आदिंची उपस्थिती होती.प्रास्ताविक आयोजक कमलेश निमगडे तर संचालन व आभार
सचिन फुलझले यांनी मानले.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here