HomeBreaking Newsडॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली असल्याचं फार्मासिस्टच्या...

डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली असल्याचं फार्मासिस्टच्या चौकशीत स्पष्ट….

चंद्रपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अशातच पोलिसांनी केलेल्या नागपूरच्या एका फार्मासिस्टच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली असल्याचं फार्मासिस्टच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे.तसेच यासंदर्भातील व्हाट्सअप्प चॅटिंगही उपलब्ध आहे. डॉ. शीतल आमटे यांच्याकडे 2 कुत्रे आहेत. ते काही दिवसांपासून पिसाळल्यासारखे करत होते, त्यामुळे त्यांना देण्यासाठी ही इंजेक्शन्स त्यांनी मागवली होती. ‘अँनेस्थेशिया’ श्रेणीतील ही इंजेक्शन्स असून मागवलेल्या 5 इंजेक्शन्सपैकी 1 शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी आता या इंजेक्शनवर तपास केंद्रीत केला आहे.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!