नागपूर: तब्बल पाच दशकांहून अधिक काळ नागपूर पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या भाजपला यंदा महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीमुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातील पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या अभिजित वंजारी यांनी अनपेक्षितपणे मोठी आघाडी घेतली आहे.
Advertisements
आतापर्यंत याठिकाणी 28000 मतांची मोजणी झाली. यापैकी 12617 अभिजित वंजारी यांना मिळाली आहेत. तर भाजपच्या संदीप जोशी यांना अवघी 7767 मते मिळाली आहेत. नागपूरमधील भाजपची ताकद पाहता हा कल भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
Advertisements
Advertisements