Advertisements
Home आंतरराष्ट्रीय दारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर...सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात

दारू संपली अन त्यांनी प्यायले सॅनिटायजर…सात जणांचा मृत्यु तर दोघेजण कोमात

पार्टी सुरू असताना दारू संपल्याने उपस्थित लोकांनी अल्कहोलयुक्त सॅनिटायझर प्यायले. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला असून यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर दोघे कोमात गेले आहेत. रशियातील ही घटना आहे.

Advertisements

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, रशियातील तातिन्सकी जिल्ह्यातील तोमतोर गावात 9 जण पार्टीसाठी जमा झाले होते. पार्टी ऐन रंगात आली असताना दारू संपली. यामुळे या 9 जणांनी सॅनिटायझरचे सेवन केले. या सॅनिटायझरमध्ये जवळपास 69 टक्के मिथेनॉल होते.

कोरोना काळात हात जंतूमुक्त करण्यासाठी विकले जाणारे हे सॅनिटायझर प्यायल्याने पार्टीत उपस्थित सर्वांचीच प्रकृती बिघडली. यातील तिघांचा गावीच मृत्यू झाला. अन्य 6 जणांना उपचारासाठी विमानाने राजधानी याकुत्स्कला नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना 4 जणांची प्राणज्योत मालवली. दोघे अद्यापही कोमात आहेत. या प्रकरणी पोलिसात सॅनिटायझरमुळे विषबाधा झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, सॅनिटायझरचे सेवन केल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याने रशियन सरकार खडबडून जागे झाले आहे. सरकारने लोकांना दारूला पर्याय म्हणून सॅनिटायझर न पिण्याचे आवाहन केले आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर… चंद्रपुरातील निवासी डॉक्टर झाले या संपामध्ये सहभागी..

चंद्रपूर: राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) आजपासून संपाची (Strike) घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या या संपानंतर राज्यातील सर्वच शासकीय...

लघवीचा घाणेरडा वास येतोय? तर होऊ शकतो ‘या गंभीर’ आजाराचा धोका…

अनेकदा लघवी करताना तुमच्या लघवीचा रंग खुपच पिवळा असतो. अथवा लघवी केल्यानंतर तुम्हाला जळजळ किंवा दुर्गंधी येण्यासारख्या समस्या जाणवतात. या समस्या काही साध्यासुध्या नाही...

मुलाचा जीव वाचविण्यासाठी गरीब बापाचे मदतीचे आवाहन…

सन्माननीय, महोदय, माझा मुलगा हिमालय जीवनदास गेडाम, वय वर्ष 23 याला मेंदू तील आजार जळल्यामुळे त्याची वाचा गेली आहे. बोलता तर येत नाही परंतु एक्साइट लकवा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा आयोजन श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचा उदघाटन

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक) आल्लापल्ली :- दिनांक २६ जानेवारी २०२३ ला मन्नेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल(सर्कल)क्रिकेट सामन्यांचे आयोजन राजे धर्मराव हायस्कूल आल्लापल्ली...

प्रणालीने शालेय साहित्य वितरण करून साजरा केला वाढदिवस…

चंद्रपुर: आपला वाढदिवस हा केक कापून साजरा व्हावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी अनेकजण अवाढव्य खर्च करून आपला वाढदिवस साजरा करतात. परंतु प्रणाली दहागावकर या...

आयुष्मान कार्ड असेल तर मिळेल राव,पाच लाखांपर्यंतचा मोफत ईलाज..

बळीराम काळे जिवती : ( तालुका प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य राज्य सरकारने माहत्मा फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून,आयुष्मान भारत ही...

सिंदेवाही महीला शहर काँग्रेस तर्फे हळदी -कुंकू कार्यक्रमाचे आयोजन… हजारो महिलांची उपस्थिती – मकरसंक्रांत निमित वाणाचे वितरण…

सिंदेवाही- महीला शहर काँग्रेस तर्फे स्थानीक श्रवण लॉन सभागृहात मकरसंक्रांतीच्या पर्वावर हळदी- कुंकू तथा वान वितरणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून राज्याच्या...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!