आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विविध सार्वजनि‍क ठिकाणी उपलब्‍ध केल्‍या १३८ ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन

342

कोरोना संसर्गाच्‍या काळात सेवाकार्याच्‍या माध्‍यमातुन गोरगरीब जनतेला मदत करणारे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍याच्‍या दृष्‍टीने सार्वजनिक ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध केल्‍या व त्‍या माध्‍यमातुन नागरिकांमध्‍ये स्‍वच्‍छतेबाबत जागरूकता निर्माण केली. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रासह जिल्‍हयातील अनेक भागांमध्‍ये 138 ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.

बललारपूर नगर परिषद क्षेत्रात नगर परिषद इमारत, तहसिल कार्यालय, रेल्‍वे स्‍टेशन, बसस्‍थानक, न्‍यायलय इमारत, एलआयसी कार्यालय, विविध बँकांमध्‍ये 21 सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत. चंद्रपूर तालुक्‍यातील ग्राम पंचायत दुर्गापूर, ऊर्जानगर, चिचपल्‍ली, नागाळा, अजयपूर, वरवट, मोहर्ली, भटाळी, बोर्डा, जुनोना, मामला, चोरगांव, बल्‍लारपूर तालुक्‍यातील ग्राम पंचायत बामणी, दहेली, कोर्टीमकता, लावारी, पळसगांव, कवडजई, इटोली, किन्‍ही, गिलबिली, मानोरा, काटवली, हडस्‍ती, आमडी, मुल तालुक्‍यातील ग्राम पंचायत चिचाळा, केळझर, चिरोली, हळदी, भेजगाव, बेंबाळ, नांदगाव, डोंगरगाव, चिखली, सिंताळा, बाबराळा, गोवर्धन, पंचायत समिती मुल, पोंभुर्णा तालुक्‍यातील ग्राम पंचायत चिंचलधाबा, जुनगांव, घाटकुळ, भिमणी, नवेगाव मोरे, दिघोरी, चकठाणा, घोसरी, देवाडा खुर्द, जामखुर्द, जामतुकूम, आंबेधानोरा, उमरी पोतदार, आष्‍टा, घनोटी नं. 1, बोर्डा झुल्‍लुरवार, चेक फुटाणा, पिपरी देशपांडे, केमारा, पंचायत समिती पोंभुर्णा या ठिकाणी सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.

याशिवाय राजुरा, गोंडपिपरी, मुल, पोंभुर्णा, बल्‍लारपूर येथील ग्रामीण रूग्‍णालये, मारोडा, राजोली, कोठारी, चिरोली, बेंबाळ, नवेगाव मोरे चिचपल्‍ली, दुर्गापूर, बाळापूर, विसापूर, कळमना, घुग्‍गुस, साखरवाही येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे, गोंडपिपरी, गडचांदूर, मुल, चंद्रपूर येथील तहसिल कार्यालये व पंचायत समिती कार्यालय, विविध नगर पंचायती, नागभीड व मुल येथील कोविड सेंटर, सिटी पोलिस स्‍टेशन, रामनगर पोलिस स्‍टेशन, वाहतुक नियंत्रण शाखा, स्‍थानिक गुनहे शाखा, सायबर सेल, दुर्गापूर पोलिस स्‍टेशन, पोंभुर्णा, बल्‍लारपूर येथील पोलिस स्‍टेशन, चंद्रपूर पोलिस मुख्‍यालय, चंद्रपूरातील सरदार पटेल महाविद्यालय, राजीव गांधी महाविद्यालय, एफ.ई.एस. गर्ल्‍स कॉलेज, चिचपल्‍ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, मुख्‍य डाकघर चंद्रपूर आदी ठिकाणी आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.

भारतीय जनता पार्टीने राज्‍यभर छेडलेल्‍या आंदोलनाच्‍या माध्‍यमातुन राज्‍य शासनाने देवालये उघडण्‍याचा निर्णय घेतल्‍यानंतर चंद्रपूरचे आराध्‍य दैवत माता महाकाली मंदीर देवस्‍थान, श्री गजानन मंदीर, श्री साईबाबा मंदीर, श्री माता कन्‍यका देवस्‍थान या ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने करण्‍यात येणा-या विविध उपाययोजनांदरम्‍यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍याचा हा पुढाकार अतिशय महत्‍वपूर्ण ठरला आहे.