वर्धा नदीत बुडालेल्या दोन युवकांचे मृत्युदेह सापडले..

0
504
Advertisements

शनिवारला दुपारी घुग्घुस येथील अमराई वार्ड परिसरातील प्रचल वानखेडे, प्रविन गेडाम, पृथ्वीराज आसुटकर, अनिल गोगला व सुजल वनकर हे पाच युवक मित्र नकोडा वर्धानदीच्या घाटावर पोहण्यासाठी गेले.

घुग्घुस पोलिसांनी बुडालेल्या तिन युवकांना शोधण्यासाठी शनिवार सायंकाळी दोन बोट व शोध पथक चंद्रपूर येथुन बोलाविले होती.
आज सकाळी घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, भाजपा वाहतूक आघाडीचे उपाध्यक्ष विनोद चौधरी, घुग्घुस भाजपा युवामोर्चा शहराध्यक्ष अमोल थेरे, भाजपाचे शरद गेडाम, कोमल ठाकरे, स्वप्नील इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घुग्घुसचे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे, सहा.पो.नि. गोरक्षनाथ नागलोत, मंगेश निरंजने व रंजित भुरसे यांनी घटनास्थळी बचाव पथकासह शोध मोहीम राबवित असतांना प्रचल प्रशांत वानखेडे (१५) रा. वार्ड क्र.२ घुग्घुस व प्रुथ्विराज पुंडलीक आसुटकर (२१) रा. वार्ड क्र २ घुग्घुस याचा म्रूतदेह आढळला पोलिसांनी पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठविनार आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here